राज्यात दुसर्यांदा पुलोद प्रयोग शिवस्वराज्य पुरोगामी आघाडीची चर्चा, भाजपचीही मॅजिक फिगरसाठी धडपड शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस राज्यात भाजप आणि शिवसेना महायुतीचे सरकार येण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे सांगून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर समन्वय थांबवून बंद केलेल्या दाराला आता घट्ट कडी घातली आहे. दुसरीकडे फडणवीस हे खोटे बोलत असून अशा खोट्या लोकांबरोबर सत्ता कशी काय स्थापन करायची म्हणून आम्ही चर्चेची दारे बंद केली आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही स्पष्ट केल्याने आता भाजप-शिवसेना युतीचे सरकार येणार नाही, हे वास्तव समोर आले आहे. परिणामी राज्यात दुसर्यांदा पुलोद प्रयोग होण्याची दाट शक्यता असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९८०च्या दशकात पुरोगामी लोकशाही दल स्थापन करत सत्ता स्थापन केल्याचा इतिहास आहे.तर भाजपने 145 ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी जोरदार धडपड सुरू केल्याची माहीती भाजपच्या सूत्रांनी दिली.यावेळी मुख्यमंत्री आमचाच असा ठाम निर्धार करणार्या शिवसेनेची पडद्यामागून सुरू असलेली हालचाल आता वास्...
पोस्ट्स
नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे