उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली!
उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली! बीड दि.१६( प्रतिनिधी): बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकाल कधी जाहीर होणार याची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 17 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन मार्फत उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उद्या निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या लिंकवर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड • एज्युकेशन मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी १ नंतर उपलब्ध होतील, अशी माहिती विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. निकाल असा चेक करता येईल? https://mahresult.nic.in/https...