विधानसभेच्या निवडणुकीबाबत पवार-सोनिया यांच्यात चर्चा

नवीदिल्ली वृत्तसंस्था
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या दिल्ली येथील 10 जनपथ या निवासस्थानी भेटीसाठी पोहचले आहेत. या दोघांमध्ये पाऊण तासांहून अधिक काळ चर्चा सुरू होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधीही लागू शकते. त्याच संदर्भात सोनिया यांच्याशी चर्चा करण्यासाठी पवार दिल्ली येथे गेले होते. या दोघांमध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत काय करायचे, याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना भाजपने आस्मान दाखवले. आता विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला कशी टक्कर द्यायची, याबाबत या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा