मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

नगर : प्रतिनिधी
बंगालच्या खाडीवर असलेले पावसाचे ढग महाराष्ट्राकडे ओढले जात असल्याने आजपासून विदर्भ, मराठवाडा या बाजूने येत परतीचा पाऊस वाढत जाणार असून, मध्य महाराष्ट्रा सह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्याच्या परिस्थितीत पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ प्राध्यापक बी. एन. शिंदे यांनी दिला आहे.
शिंदे म्हणाले की, दहा दिवसांपूर्वी बंगालच्या खाडीकडून आलेले सौम्य वादळ सर्व महाराष्ट्रात मध्यम ते चांगला पाऊस देत गुजरातकडे गेले. कोकण व सह्याद्री पर्वताच्या भागातील धरणातही नवीन पाणी जमा झाले आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवस पावसाचा खंड पडला. पण आता त्याच वादळाचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होऊन ते वादळ आज ओमानला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या खाडीचे ढग महाराष्ट्राकडे ओढले जाऊन पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार पावसाची होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे.
आजपासून सुरू होणारा पाऊस हा अधून-मधून खंड पडत दसर्यापर्यंत राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो.
शेतकर्यांनी पावसापूर्वी
शेतीचे कामे पूर्ण करावीत
त्यामुळे शेतकर्यांनी पावसापूर्वी पेरण्या, बाजरीच्या काढण्या व पिकांमधील अंतरमशागती करून खतांचे डोस द्यावेत. त्यामुळे पिके चांगली येतील. हा पाऊस जोराचा, अधून-मधून वादळी, विजांचा होणार असल्याने पिकांवरच्या किडी बर्याच प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा