“शरद पवारांचे पाय मराठवाड्याला लागले अन् मराठवाड्यात धो-धो पाऊस बरसला”

“शरद पवारांचे पाय मराठवाड्याला लागले अन् मराठवाड्यात धो-धो पाऊस बरसला”


हिंगोली प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मराठवाड्याला पाय लागले आणि मराठवाड्यात धोधो पाऊस बरसला असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. अमित शहांनी पवार साहेबांवर आरोप केला, साहेबांनी जेवढे विमानतळ काढले तेवढे तुम्हाला गुजरातमध्ये बसस्टँड सुद्धा काढता आले नाहीत, अशी टीकाही धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली आहे.

गुरुवारी शरद पवार हे हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलत असताना धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

उदयनराजे महाराज यांच्या दिल्लीतील भाजप प्रवेशाला किमान पंतप्रधान यायला पाहिजे होते, महाराजांचा प्रवेश कुणाच्या हातून झाला, जनतेतून उत्तर आलं. तडीपाराच्या हातून, हा आमच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

भाजपचे अध्यक्ष म्हणतात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संपवून टाकणार. आमच्यासारखे खमके मावळे पवार साहेबांच्या पाठिशी आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे, पवार साहेबांचे विचार संपणार नाहीत, असंही मुंडे यांनी म्हटलं आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन