... तर निवडणुकीतून माघार, पवारांबद्दल बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर

... तर निवडणुकीतून माघार, पवारांबद्दल बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर


 सातारा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूक 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकांसोबतच सातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक होईल. तर, 24 ऑक्टोबरला या जागेसाठी मतमोजणी होणार असल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे.

मात्र, जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजेंनी म्हटले.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. त्यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत भाष्य केलं नव्हतं. मात्र, 21 ऑक्टोबर रोजी ही पोटनिवडणूक होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे साताऱ्याचा खासदार दिवाळीपूर्वी ठरणार हे आता निश्चित झालं आहे. साताऱ्याच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच, तेथील उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. तर, राष्ट्रवादी समर्थकांकडून शरद पवार यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असा आग्रह सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचंही समजते. तसेच शशिकांत शिंदे, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावेही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. मात्र, शरद पवार स्वत: निवडणूक लढवणार असतील, तर मी माघार घेईल, असं उदनयराजेंनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना उदयनराजे भावूक झाले होते, त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा असल्याचं विचारताच, पवार उभारणार असल्यास मी माघार घेईल, असं उदयनराजेंनी जाहीर केलं आहे. त्यामुळे साताऱ्यात शरद पवार विरुद्ध उदयनराजे असा सामना रंगणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन