गणपती विसर्जनाच्या वेळी खाडीपात्रात दोन शाळकरी मुले बुडाली :शोध सुरु

गणपती विसर्जनाच्या वेळी खाडीपात्रात दोन शाळकरी मुले बुडाली :शोध सुरु

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील पडवे बंदर येथे गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे. पडवे बंदर येथील खाडीपात्रात दोन शाळकरी मुले बुडाली आहेत. ऋत्विक भोसले आणि कुलदीप वारंग अशी दोघांची नावे आहेत. दोघेही पडवे गावातील टुकरूल वाडी येथील रहिवासी आहेत. दोघेही अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
 ही मुले गणपती विसर्जन करण्यासाठी गेली असताना हा प्रकार घडला. पाण्याचा अंदाज न आल्याने सदर दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ऋत्विक आणि कुलदीप दोघेही मुंबईत वास्तव्याला होते. मात्र, गणेशोत्सवासाठी ते गावी आले होते. या घटनेमुळे पडवे गावावर शोककळा पसरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन