मोदीच काय, ट्रम्प आणले तरी माझा विजय कुणी रोखू शकत नाही : धनंजय मुंडे

मोदीच काय, ट्रम्प आणले तरी माझा विजय कुणी रोखू शकत नाही : धनंजय मुंडे



बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत  भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. 17 तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत येतायत. तर दुसरीकडे 18 तारखेला याच परळीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून भाजप  उमेदवार दहशतीत आहेत, असं सांगत नरेंद्र मोदीच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणलं तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय.
“उमेदवारी अर्ज दाखल करायच्या दिवसापासून भाजपने जो धसका घेतलाय, ते आणखी त्यातून बाहेर निघालेले नाहीत. त्यांना वाटलं की मोदी आल्याशिवाय आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. हे कळाल्यावर मी भाजपच्या एका मोठ्या नेत्याला म्हणालो, मोदी मागच्या महिन्यात अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराला गेले होते. 17 ला मोदी येत आहेत, 19 ला ट्रम्प जरी आणले तरी विजय कुणीही रोखू शकत नाही अशी परिस्थिती आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

परळीत प्रतिष्ठेची लढत

पंकजा मुंडे राजकीय खेळी करण्यात आतापर्यंत धनंजय मुंडेंवर वरचढ ठरल्या असल्या तरी खऱ्या लढाईची प्रतिक्षा आहे. धनंजय मुंडेंनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करत भावनिक साद घालणं सुरु केलंय. तर पंकजा मुंडे दिवसभर राज्यभरातील भाजप उमेदवारांचा प्रचार करुन सायंकाळी परळीत स्वतःचा प्रचार करतात. धनंजय मुंडेही परळीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय.

पंतप्रधान मोदींची सभा

भाजपकडून राज्यात सभांचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीत 17 तारखेला सभा होईल. परळीतील मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी ज्या मैदानात सभा घेतली होती, त्याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होणार आहे. याच दिवशी राज्यात इतर ठिकाणीही ते सभा घेणार आहेत. मोदी रविवारपासून प्रचारसभांचा धडाका सुरु करणार आहेत. आज रविवार दिनांक १३ रोजी राज्यातील तीन ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन