सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीत टाकला मिठाचा खडा

बीड प्रतिनिधी
राज्य कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्यात होणारे पगार याच महिन्यातील २४ ऑक्टोबर पूर्वी करावेत म्हणजे दिवाळीपूर्वी करावे असा शासन आदेश काढण्यात आला होता. परंतु शासनाने सदर आदेश रद्द करून कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळीपूर्वी काढू नये असा नवीन शासनादेश काढला. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होणार नाहीत. आजच्या या शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणात मिठाचा खडा टाकण्याचे काम सरकारकडून झाले आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कर्मचारी वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्य सरकारी कर्मचारी कृषी विद्यापीठ कर्मचारी निवृत्तीवेतनधारक जिल्हा परिषद व खाजगी संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिवाळी गोड करण्याच्या निमित्ताने दिनांक 09 ऑक्टोबर रोजी एक परिपत्रक काढून दिवाळीपूर्वी म्हणजेच दिनांक 24 ऑक्टोबर पूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर चे वेतन हे दहा दिवस अगोदर करण्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. कदाचित याचा फायदा सध्याच्या सरकारला झाला असता. त्याच उद्देशाने सरकारने हा आदेश काढला होता.
परंतु आज सरकारने सदरील आदेश रद्द करत दिवाळीपूर्वी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ही करता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढून सरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिवाळी गोड करण्याऐवजी त्यांच्या दिवाळीसणात मिठाचा खडा टाकण्याचे काम केले आहे.
आजच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळी सणाच्या काळात पैशाची चणचण भासणार,आर्थिक नियोजन ढासळणार असल्यामुळे झालेल्या या निर्णयामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने आज काढलेला नाही मागे पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन करावे सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा