राज्यात 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा सरकारचा विचार! -ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती
राज्यात 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा सरकारचा विचार!
-ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील 100 युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज देण्याचा विचार सध्या सरकारी पातळीवर सुरू असल्यामुळे येणार्या आर्थिक भार व अनुषंगिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. ही समिती तीन महिन्यात अहवाल देणार असून त्यानंतर पुढची पावले उचलण्यात येतील, असे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यातील 100 युनिटपर्यंतच्या वीज ग्राहकांना मोफत वीज देण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मानस आहे. त्यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत.
महावितरण तसेच ऊर्जा खात्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे, गळती रोखणे, वसुलीचे नवीन निकष तयार करून सर्वसामान्य जनतेवर याचा भार पडणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले. वीज उत्पादन खर्च कमी करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर वीज दरात दिलासा देता येऊ शकतो. महावितरणसह तिन्ही कंपन्यांना त्यांच्या खर्चात कपात करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी योजनाही तयार करण्यात येणार आहे. 100 युनिटपर्यंत वीज वापर करणार्या गरीब ग्राहकांना कसा दिलासा देता येईल यासाठी ऊर्जा खात्यातील अधिकार्यांची समिती नेमण्यात आली आहे. तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर सरकार पातळीवर या प्रस्तावावर विचार करण्यात येईल व समग्र चर्चेनंतरच मोफत वीजेबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत 200 युनिट पर्यंतची वीज मोफत केली आहे. 201 ते 401 युनिटपर्यंत वीज वापर करणार्या ग्राहकांना 50 टक्के सवलत आहे. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील 100 युनिटपर्यंतच्या वीज वापराला मोफत करण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचे राऊत यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा