शेतकरी कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पर्यंत पूर्ण करा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
शेतकरी कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पर्यंत पूर्ण करा!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
मुंबई (प्रतिनिधी) : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी 15 एप्रिल पूर्वी पूर्ण करून शेतकर्यांना कर्ज आणि चिंतामुक्त करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि बँकेच्या अधिकार्यांना दिले आहेत. कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान येथून जिल्हा यंत्रणेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असणार्या ‘वर्षा’ या निवासस्थानी आढावा बैठक घेतली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, हे सरकार सत्तेवर आल्यावर महिन्याभराच्या आत कर्जमुक्ती योजनेचे धाडसी पाऊल उचलले आहे. 21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यावेळी केंद्रांवर शेतकर्यांची गर्दी होईल. अशा वेळी प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांनी शेतकर्यांना चांगली वागणूक द्यावी. त्याच्याशी सौजन्याने वागा. त्याचे म्हणणे ऐकून घ्या. त्याची तक्रार स्थानिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
देशातील सर्वात मोठी योजना
ही कर्जमुक्ती योजना राबविताना शेतकर्यांवर आपण उपकार करतोय या भावनेतून काम करू नका, असे सप्ष्ट करतानाच शेतकरी शासनाकडे आशेने पाहतोय त्याचे समाधान करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही योजना डिसेंबरमध्ये जाहीर केली आणि तिची अंमलबजावणी मार्चपासून करू, असा शब्द शेतकर्याला दिला आहे. शेतकर्याने आतापर्यंत जो विश्वास दाखविला आहे त्याला तडा जाऊ देवू नका, असे आवाहन करतानाच कर्जमुक्तीची ही देशातली सर्वात मोठी योजनाच असल्याचे सांगून संपूर्ण देशाचे आपल्याकडे लक्ष आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा यंत्रणेला सांगितले.
15 एप्रिलपर्यंत योजना पूर्ण करावी
आताच्या काळापुरती ही योजना आहे. जिल्हा यंत्रणेने 31 मार्चपूर्वी ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. जास्तीत जास्त 15 एप्रिलपर्यंत योजना पूर्ण झाली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दुर्गम भागातील शेतकर्यांच्या अडचण समजून घ्या आणि त्यावर तत्काळ तेथेच उपाय शोधा. शेतकर्यांशी चांगले वागा. त्यांची शासनाबद्दल नाराजी राहणार नाही याची काळजी घ्या. आतापर्यंत योजनेचे काम अल्पावधीत व्यवस्थित झाले आहे त्यात सातत्य ठेवा, असे निर्देशही त्यांनी दिले.
कर्जखात्याशी आधार जोडणीचे प्रमाण 95 टक्के
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक, परभणी, रायगड या जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकर्यांची एक लाखांपेक्षा जास्त संख्या आहे. कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडणीचे प्रमाण 95 टक्के आहे. आधार क्रमांकाचे प्रमाणीकरणाची सोय आपले सरकार सेवा केंद्र, बँका आणि स्वस्त धान्य दुकांनामध्ये करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी रोजी पोर्टलवर याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर या गावनिहाय याद्या जिल्हाधिकार्यांमार्फत गावात चावडीवर लावण्यात येतील. जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय समिती गठीत करतील

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा