मनसे’च्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली
‘मनसे’च्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली
मुंबई – ‘मनसे’च्यावतीने घुसखोरांविरोधात उद्या रविवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी सदर मोर्चाला परवानगी नाकारली असून फक्त आझाद मैदानात सभा घ्या, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चे काढण्यास मनाई आहे. संवेदनशील आणि गजबजलेला भाग तसेच अनेक परदेशी दुतावास असल्याने दक्षिण मुंबईत मोर्चाकरता मनाई आहे, असे पोलिसांनी सांगितले.
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी मनसेच्या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. मात्र, मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. चौक सभांमधून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. कलम 143, 144 आणि 149 नुसार प्रतिबंधात्मक कारवाईनुसार या नोटीसा पाठवल्या आहेत.
पोलिसांच्या या भूमिकेनंतर मनसे नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर सडकून टीका केली. रात्रभर चालणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत नाही. मात्र, आम्ही एक मोर्चा काढल्याने लगेच कसा प्रश्न तयार होतो, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यामुळे मनसेच्या या महामोर्चाआधी वातावरण ढवळून निघाले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा