झाडाबद्दल प्रेम वाटतं ही आनंदाची बाब- अभिनेता सयाजी शिंदे
देशातल्या पहिल्या वृक्ष संमेलन दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
उद्या आणि परवा देवराईत वृक्ष संमेलन
झाडाबद्दल प्रेम वाटतं ही आनंदाची बाब- अभिनेता सयाजी शिंदे
बीड :- वडाच्या नावाने चांगभलं, लिंबाच्या नावाने चांगभलं, अरं येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय दुसरं कोण’ या घोषणांनी आज बीड शहर दणाणून गेले. देशातलं पहिलं वृक्ष संमेलन उद्या आणि परवा पालवण नजीकच्या देवराई माळरान डोंगरावर होत असून त्या संमेलनाच्या निमित्ताने आज सकाळी शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली. या दिंडीत दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत वेगवेगळ्या वेशभुषा करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजीत वृक्ष संमेलनास मोठा प्रतिसाद मिळत असून एखाद्या पक्षाबद्दल प्रेम वाटण्यापेक्षा पक्ष्यांबद्दल प्रेम बीड आणि जिल्ह्यातील अबालवृद्धांना वाटतं, याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सयाजी शिंदेंनी वृक्षदिंडीच्या समारोपप्रसंगी दिली.
उद्या दि.13 आणि दि.14 फेब्रुवारी रोजी पालवण नजीकच्या देवराई माळरान डोंगरावर देशातलं पहिलं वृक्ष संमेलन अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि वनविभागाच्या मदतीतून होत आहे. त्यानिमित्ताने आज सकाळी शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. या वेळी अभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, आ. संदीप क्षीरसागर, शिवराम घोडके यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या दिंडीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिंडीस सुरुवात केली. वृक्ष ठेवलेल्या पालखीला सयाजी शिंदे, संदीप क्षीरसागर यांनी खांदा देऊन ही दिंडी सुरू झाली. या दिंडीमध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता. अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी वेगवेगळी वेशभुषा केली होती. झाडांवर प्रेम करा, झाड लावा-जगवा, असे फलक अनेक विद्यार्थ्यांच्या हातात होते. वडाच्या नावाने चांगभलं, लिंबाच्या नावाने चांगभलं, अरं येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय दुसरं कोण, अशा घोषणांनी शहर दणाणून गेलं होतं. वृक्षदिंडीला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे समाधान अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदरची दिंडी आली. नजीकच्याच छत्रपती संभाजी महाराज क्रीडा मैदानावर या दिंडीचा समारोप झाला. या वेळी सयाजी शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एखाद्या पक्षाबद्दल प्रेम वाटण्यापेक्षा पक्षांबद्दल प्रेम वाटावं, यापेक्षा आनंदाची दुसरी ती गोष्ट काय, उद्या आणि परवा देवराईत वृक्ष संमेलन होत आहे. या संमेलनाचं अध्यक्षपद हे वडाच्या झाडाकडे आहे. हे अध्यक्षपद वर्षानुवर्षे यांच्याकडेच राहणार आहे. आता आपल्याला फक्त वृक्षांची लागवड करायची आहे ते जगवायचे आहे. मी मोठ्या फुशारक्या मारणार नाही. महाराष्ट्र बदलायचाय, देश बदलायचाय असेही म्हणणार नाही. फक्त आपण आपआपल्या गावात वृक्षांची लागवड करा, त्याची जोपासना करा, सर्वत्र जंगलसदृश्य करून वाळवंटमय असलेल्या जिल्ह्याची ओळख पुसून काढा, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी या वेळी केली. उद्या आणि परवा वृक्ष संमेलनात अनेक मान्यवरांचे व्याख्यान आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने या संमेलनास उपस्थिती दर्शवा, असेही सयाजी शिंदे यांनी या वेळी आवाहन केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा