रॅगिंगने घेतला भावी डॉक्टरचा बळी
रॅगिंगने घेतला भावी डॉक्टरचा बळी
बीड प्रतिनिधी : ' महाविद्यालयात रॅगिंगचा होणारा त्रास कोणाला सांगता येत नाही, घरी अथवा महाविद्यालयात कोणाची नावे सांगितली तर पुढे चार वर्ष त्रास होईल ही भीती आणि रॅगिंग सहनही होत नाही हि परिस्थती ' यातूनच बीएएमएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या १८ वर्षीय गणेशने स्वतःच्या गावाकडे येऊन आत्महत्या केली. केवळ रॅगिंग होतच असते, महिना दोन महिन्याने सारे नीट होईल या मानसिकतेने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. मात्र यातूनही महाविद्यालय प्रशासन काही शिकायला तयार नसून स्वतःची कातडी बचावण्यासाठी धडपडताना दिसत आहे.
नाळवंडी (ता. बीड ) येथील कैलास म्हेत्रे या शेतकऱ्याचा गणेश हा मुलगा . सारे शिक्षण वडवणीला चुलत्याकडे झाले. चुलते दामोदर शिक्षक मुळात नाळवंडीचे मेहत्रे कुटुंब गावात अत्यंत पापभिरू , अध्यात्मिक परंपरा जपणारे म्हणून ओळखले जाते . अशा कुटुंबातला गणेश अगदी पहिलीपासूनच हुशार. दहावीत असताना तालुक्यातून पहिला आलेला . त्यामुळे आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे हे पालकांचे स्वप्न . त्याने तसा अभ्यास देखील केला . नीट परीक्षेच्या माध्यमातून त्याला उदगीरच्या धन्वन्तरी आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मात्र पहिले वर्ष देखील संपायच्या आत त्याने शुक्रवारी (दि. ७ ) स्वतःच्या गावाकडे शेतात विषारी औषध पिले आणि त्याचा शनिवारी मृत्यू झाला . महाविद्यालयात झालेल्या रॅगिंग मुळेच त्याने आपले जीवन संपवले असे गणेशच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
'महाविद्यालयाने पहिल्या वर्षी होस्टेलची सक्ती केली, म्हणून होस्टेलची फी भरून त्याला तिथे ठेवले , मात्र पहिल्याच दिवशी त्याला होस्टेलवर रॅगिंगचा त्रास झाला , म्हणून मग भरलेली फी वाया गेली तरी हरकत नाही , पण त्रास नको म्हणून त्याला बाहेर खोली करून दिली . मात्र नंतरही त्याला त्रास कमी झाला नाही. तो अनेकदा गावाकडे यायचा , रडायचा . पण कोणी त्रास दिला त्याचे नाव सांगायचा नाही. अनेकदा गावाकडे यायचा , त्यावेळी पुन्हा जायला तयार नसायचा . मध्यंतरी एकदा त्याच्या महाविद्यालयातून उपस्थिती कमी असल्याबाबत फोन आला , त्यावेळी आपण त्यांना रॅगिंग होतेय म्हणून तो अनेकदा गावाकडे असतो असे सांगितले होते, पण त्याची कोणी दखल घेतली नाही. आम्हाला कोण रॅगिंग करायचे त्यांची नावे त्याने कधी सांगितली नाहीत. कदाचित पुढे त्रास होईल ही भीती त्याला असावी . अनेकजण हे चालताच असत , दोन- चार महिन्यांनी कमी होईल असे सांगायचे. पण यातूनच त्याने गावाकडे आल्यानंतर विष पिले आणि स्वतःचा जीव गमावला ' असे सांगताना गणेशचे चुलते दामोधर म्हेत्रे यांना अश्रू रोखणे कठीण होत आहे. ' तो सकाळी शेतात गेला होता, त्याला दुपारून महाविद्यालयात जायचे होते , तो दुपारी जेवायला येतो म्हणाला , पण तो आलाच नाही ' असे सांगताना म्हेत्रे कुटुंबाला आपल्या भावना आवरता येत नाहीत.
महाविद्यालयाला प्रतिष्ठेची चिंता
रॅगिंगमुळे आपल्या लेकराचा जीव गेला या दुख्खात मेहत्रे कुटुंब आहे , मात्र महाविद्यालय प्रशासनाला त्यांच्या दुख्खापेक्षा स्वतःच्या प्रतिष्ठेची चिंता आहे. महाविद्यालयातून दामोधर म्हेत्रे यांना फोन आला तो सांत्वन करण्यासाठी नाही, तर दत्ता पाटील नामक इसम ' तुम्ही टीव्हीवर रॅगिंगमुळे मृत्यू झाला असे कसे सांगितले' हे विचारण्यासाठी . आमच्या महाविद्यालयात रॅगिंग होत नाही हे सांगत तुमच्या मुलाला बीएएमएस करायचे नसेल असे सांगण्याचा प्रयत्न या दत्ता पाटील नामक इसमाने केला. मात्र प्रथम वर्षाचा विद्यार्थी होस्टेलची पूर्ण फी भरूनही एकाच दिवसात हॉस्टेल का सोडतो, किंवा रॅगिंगमुळे विद्यार्थ्याची अनुपस्थिती आहे असे पालकांनी सांगूनही रॅगिंगग कोण घेते याचा शोध महाविद्यालय घेत नाही आणि आता मात्र आपल्या भोवती काही येऊ नये यासाठी वातावरण निर्मिती करू पाहते हे पाषाणहृदयीपणाचे लक्षण आहे .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा