कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
पुणे : विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटक परिसरावर हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी झाला आहे. तर पूर्वेकडील बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडील अरबी समुद्राकडून वाहणार्या वार्याचा संगम होत आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. परिणामी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
सध्या मध्य भारतात पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणार्या वार्यांचा संगम होत आहे. त्यामुळे विदर्भासह छत्तीसगड, ओडिशामध्ये पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. तर विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान झाले आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागात गारठा वाढला आहे. काल राज्यात महाबळेश्वर येथे नीचांकी 9.9 अंश सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली. मागील 24 तासांत रत्नागिरी 15.9, पुणे 10.1, नगर 12.2, कोल्हापूर 15.5, नाशिक 10, सांगली 13.5, सातारा 11.4, सोलापूर 18.8, औरंगाबाद 16.4, नांदेड 14, अकोला 16.5, अमरावती 16., बुलडाणा 16, चंद्रपूर 15.5, नागपूर 15.8 आणि यवतमाळ येथे 16 अंश किमान तपमानाची नोंद झाली.
शहरात थंडी वाढली
मध्य भारतात होत असलेल्या वार्यांच्या संगमामुळे राज्यात काही भागात पाऊस, तर काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुण्यासह नगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, सातारा, सांगली आणि महावळेश्वर मध्ये पुन्हा थंडीचे आगमन झाले आहे. गुरूवारी शहरात 13.8 अंश किमान आणि 31 अंश सेल्सिअस कमाल तपमानाची नोंद झाली. काल किमान-कमाल तपमानात दोन अंशानी घट झाली. त्यामुळे रात्रीच्या गारठ्यात वाढ झाली आहे. काल शहरात 10.1 अंश किमान आणि 29 अंश सेल्सिअस कमाल तपमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवसांत थंडीचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा