…तर सलग ५ दिवस मार्चमध्ये बॅंका बंद राहणार

…तर सलग ५ दिवस मार्चमध्ये बॅंका बंद राहणार

नवी दिल्ली : प्रतिनिधी

नुकतेच 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान बँक कर्मचाऱयांनी संप केला होता. या संपाला केंद्र सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लगेचच पुन्हा एकदा बँक कर्मचाऱयांनी संप ची हाक दिली आहे. बँक कर्मचारी आता 11 ते 13 मार्च असा तीन दिवस संपांची घोषणा करु शकतात.
दरम्यान, 13 मार्चला शुक्रवार असल्याने याला जोडून दुसरा शनिवार आणि रविवार आल्याने सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सणासुदीच्या काळात ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
दरम्यान, पाच दिवसांचा कायमस्वरूपी आठवडा असावा, 5 वर्षांनी त्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात याव्यात आदी मागण्यांचा  सरकारने आता विचार केला नाही तर एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन