पंकजा मुंडे शिक्षकांच्या बदल्यांवरून सरकारविरोधात आक्रमक

पंकजा मुंडे शिक्षकांच्या बदल्यांवरून सरकारविरोधात आक्रमक

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनवरुन ऑफलाईन करण्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच विद्यादानाचे पवित्र काम करणा-या शिक्षकांना कायमचे त्रासातून मुक्त केले आहे, त्यांना परत यात सरकारने ढकलू नये, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.

शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या हा विषय डायरेक्ट जनतेतून सरपंच, जलयुक्त शिवार सारखा महत्वाचा आणि लोकप्रिय आहे. जो गरीब आहे.. ज्याचा वशिला नाही.. त्यालाही अधिकार असावेत. यासारखे निर्णय रद्द करण्यापेक्षा सर्व विभागांनी त्यांना रेप्लिकेट करावे, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

एकीकडे पंकजा मुंडे हळुहळू सरकारविरोधात आक्रमक होत असताना दुसरीकडे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चाही जोर धरू लागली आहे. विधानसभा निवडणुकांना आता काही महिने उलटून गेले आहेत. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे नंतर मोठे महाभारत राज्यात घडले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले.

यानंतर आता भाजपचे पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रात मोठे बदल करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राज्यातल्या राजकारणाची सध्याची दिशा आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन अमित शाह यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक घटना घडल्या होत्या. पंकजा मुंडे या दिग्गज नेत्या पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे पक्षांतर्गतही नाराजी उफाळून आली होती. त्या पार्श्वभूमीवर काही मोठे बदल होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन