महिलेच्या खूनासह दरोडयातील आरोपी जेरबंद


महिलेच्या खूनासह दरोडयातील आरोपी जेरबंद
दरोडा प्रतिबंधक पथकाची कामगिरी, 5 गुन्हयाची केली उकल, तीन लाख दोन हाजाराचा मुद्देमाल जप्त- पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांची माहिती
बीड प्रतिनिधी:
गेवराई येथील मागील काही दिवसात वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रभारी अधिकारी गजानन जाधव यांना गेवराई भागातील गंभीर गुन्हे उघड करण्यासाठी वेगवेगळया टिम तयार करून तपास करण्याच्या कडक सुचना पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी दिल्या होत्या.  त्यानंतर सपोनि गजानन जाधव यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवून मागील काही दिवसापुर्वी पो. स्टे. गेवराई हद्दीतील झालेल्या खूनाचा तपास लावत आरोपी  शेख नदीम शेख लालु (वय.32 रा . नुरानी मस्जीद समोर, चितेश्वर गल्ली , गेवराई) सय्यद मोहम्मद उस्मान अली (वय - 28 रा . तपेश्वर नगर, झोपडपट्टी, घाटनांदुर ता, अंबाजोगाई ह . मु . पदमीनी हॉस्पीटल गल्ली, गांधीनगर, बीड)यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आशा गंभीरस्वरूपाच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली. व तीन लाख दोन हाजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले. ते पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे यांची उपस्थिती होती.
प्रविण शिवप्रसाद शर्मा (वय - 41 धंदा - पिग्मी एजंट,रा. गेवराई) यांनी 1 एप्रिल रोजी फिर्याद दिली होती की त्यांची आई पुष्पाबाई हीस अज्ञात आरोपीने मोबाईलच्या चार्जरच्या वायरने गळा दाबून जिवे मारून टाकून माझ्या घरातील कपाटातील सोन्याचांदीचे दागिने 2, 20,000 रू. किमतीचे व रोख रक्कम 5 ,00, 000 असे एकुण 7 ,20, 000 रू. चा मुद्देमाल चोरून नेला. यावरुन गेवराई पोलिस ठाण्यात 302, 460 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रभारी अधिकारी गजानन जाधव व त्यांचे सहकारी यांनी करुन कुठलाही पुरावा नसतांना व कसलाही साक्षीदार नसतांना तपासाचे कौशल्य वापरून आरोपिच्या मुसक्या आवळल्या. दुसरी कारवाई कलम 307, 323 मधील फिर्यादी जिशान अब्दुल शफीक मोहम्मद अब्दुल (वय - 32 धंदा. व्यापार,रा. मोमीन पुरा, गेवराई) यांनी दि. 8 फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली की, 7  फेब्रुवारी  2020 रोजी मी माझे कुटूंबासोबत रात्री जेवण करून घरी झोपलो असता पहाटे साडेचार वाजता माझे वडील मोहम्मद अब्दुल हे मोठयाने ओरडले असता माझी आई उठून त्यांचेकडे गेली असता तिने पाहिले की, एक अनोळखी इसम हा त्यांचे हातातील लोखंडी हातोडी सारख्या हत्याराने माझे वडील यांचे डोक्यात मारत होता. त्या इसमाने माझे आईकडे पाहिले असता तिला हात उगरून तू जा असे म्हणाला. त्यांच्या आवाजाने आमचे घरातील सर्वजण जागे झाले. तेंव्हा आमचे घराचे समोरच्या अंगणातून उडी मारून एक इसम पळून गेला. यामध्ये माझे वडिलांचे डोक्यात मार लागून रक्त निघत होते. अशी फिर्यादी दिली होती. याचा तपास पोउपनि युवराज टाकसाळ हे करीत आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास द. प्र. पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि गजानन जाधव व त्यांच्या सहकार्‍याने केला. तिसरा गुन्हा कलम 457 , 380 भादवी यातील फिर्यादी श्रीमंत नामदेव कदम (वय 57 धंदा व्यापार, रा . मोढा रोड , गेवराई) यांनी दि. 8 फेब्रुवारी 2020 रोजी पो. स्टे. गेवराई येथे फिर्याद दिली की  दि. 7 रोजी. अज्ञात आरोपीने   पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम 20000 रुपये व दुकानात प्रवेश करून दुकानाच्या गल्यातील रोख रक्कम 10000 रुपये व सोन्या चांदिचे दागिने किंमती 27000 असे एकुण 48 , 000रू . मुद्देमाल चोरून नेला.  सदर गुन्हयाचा तपास पा.ेह. वाघमारे हे करीत आहेत.  चौथा गुन्हा कलम 392 , 504 , 34 भादवी यातील फिर्यादी दत्तात्रय काशिनाथ काळे (वय 30 धंदा ट्रक ड्रायव्हर रा. गोंढाळा ता. रेणापुर), गेवराई येथे फिर्याद दिली की , मी मंत्री पेट्रोलपंप नागझरी शिवारात ट्रक क्र. के. ए . 01 एके 0829 ट्रकसह हाजर असतांना 5.30 वा. सुमारास आनोळखी 3 जण गाडीत घुसले माझ्या गळयाला चाकु लावला व पैसे काढून दे नाहीतर तुला मारतो असे म्हणुन माझे खिशातील 21000 रू. रोख व 5 ग्रॅमची अंगठी व माझे मित्राचे खिशातील 20000 रू व 5 भार चांदीचे ब्रास्टलेट 4000 असे एकुण 45 , 500 रू . चा मुद्देमाल अज्ञात चोरटयाने चोरून नेला. सदरचा गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्हयाचा तपास पोउपनि मनोजकुमार लोंढे हे करत आहेत. पाचवा गुन्हा कलम 457 , 380 भादवी यातील फिर्यादी कैलास बाळकिसन लोया (वय - 39 धंदा . व्यापार रा. धनगर गल्ली गेवराई) यांनी फिर्याद दिली की, माझे राहते घरातील दिनांक : 22 / 12 / 19 रोजी रात्री 1100 ते दि . 23 चे पहाटे 5. 45 वा. दरम्यान माझे घरातील 3, 60 , 000 / - रू . व माझे शेजारी नामे आसाराम टोपे यांच्या घरातुन 70 , 000 रू. तसेच अजित रंगनाथ राखा यांचे दुकानातून 1, 45 , 650  रू . असे एकुण 5 , 75 , 650 / - रूपये चा माल घरातुन व दुकानाचे कडी कुलूप तोडून घेऊन गेला नेला वगैरी मजकुराचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्हयाचा तपास पो . स्टे . गेवराई हे करीत असून सदर गुन्हयाचा समांतर तपास दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रभारी अधिकारी गजानन जाधव व त्यांचे सहकारी करीत आहेत.  गेवराई शहरातील व परिसरातील मालाविरूध्दचे व शरिराविरुध्दचे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी दरोडा प्रतिबंधक पथकाकडून शर्थीचे प्रयत्न केले गेले. दरोडा प्रतिबंधक पथकाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कष्टाला शेवटी फळ मिळाले. तपासा दरम्यान दिनांक : - 15 / 2 / 2020 रोजी यातील आरोपी  शेख नदीम शेख लालु वय - (32 रा . नुरानी मस्जीद समोर, चितेश्वर गल्ली , गेवराई) सय्यद मोहम्मद उस्मान अली (वय - 28 रा . तपेश्वर नगर, झोपडपट्टी, घाटनांदुर ता, अंबाजोगाई ह . मु . पदमीनी हॉस्पीटल गल्ली, गांधीनगर, बीड) हे बायपास हायवे रोड गेवराई येथे पुलाखाली दबा धरून बसल्याची गोपनिय माहिती खबर्‍याकडून गजानन जाधव यांना मिळाली त्यावरून त्यांनी आपल्या सहकार्यासह  छापा मारून दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले.त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता प्रथम त्यांनी उडवा - उडवीचे उत्तरे दिली परंतु त्यांना पोलीशी खाक्या दाखविताच त्यांनी खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आशा गंभीरस्वरूपाच्या गुन्हयाची कबुली दिली. व गुन्हयात चोरी गेलेले दागिने व पैसे यातुन मिळालेली रक्कम 3, 02 , 000- ( तीन लाख दोन हाजार रूपये ), चाकु व कोयता काढून दिले आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस अधिकारी सपोनि गजानन जाधव, सपोनि संदिप सावळे, मुंजाबा सौंदरमल, राजाभाउ नागरगोजे, श्रीमंत उबाळे, अभिमन्यू औताडे, आवारे, खताळ, मनोज वाघ, महेश भागवत, जोगदंड , गव्हाणे , महेश चव्हाण , गणेश हजारे, गित्ते, दुधाळ, डोंगरे यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन