32 लोकांना घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला

32 लोकांना घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला

बीड प्रतिनिधी : संचारबंदीचे उल्लंघन करुन कसल्याही प्रकारची परवानगी न घेता 32 लोकांना घेऊन परराज्यात जात असलेला हा कंटेनर  बीडच्या पोलिसांनी मांजरसुंबा येथे पकडला आहे.
  लोकांना घेऊन पाटोद्याकडून बीडकडे जात असलेला कंटेनर (क्र.एच.आर.38 व्ही 0866) मांजरसुंबा येथील चौकात पोलिसांनी दुपारी 12 वाजता तपासणीसाठी थांबविला असता त्यात 32 जण आढळून आले. यात महिला, पुरुष, बालके यांचा समावेश आहे. त्यानंतर नेकनूरचे सपोनि.सचिन पुंडगे यांना माहिती देण्यात आली. यावेळी तलाठी केकाण, ग्रामसेवक जाधव यांच्यासह आरोग्य पथकाने भेट दिली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन