32 लोकांना घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला
32 लोकांना घेऊन जाणारा कंटेनर पोलिसांनी पकडला
बीड प्रतिनिधी : संचारबंदीचे उल्लंघन करुन कसल्याही प्रकारची परवानगी न घेता 32 लोकांना घेऊन परराज्यात जात असलेला हा कंटेनर बीडच्या पोलिसांनी मांजरसुंबा येथे पकडला आहे.
लोकांना घेऊन पाटोद्याकडून बीडकडे जात असलेला कंटेनर (क्र.एच.आर.38 व्ही 0866) मांजरसुंबा येथील चौकात पोलिसांनी दुपारी 12 वाजता तपासणीसाठी थांबविला असता त्यात 32 जण आढळून आले. यात महिला, पुरुष, बालके यांचा समावेश आहे. त्यानंतर नेकनूरचे सपोनि.सचिन पुंडगे यांना माहिती देण्यात आली. यावेळी तलाठी केकाण, ग्रामसेवक जाधव यांच्यासह आरोग्य पथकाने भेट दिली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा