पंतप्रधान सहायता निधीसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून २५ लाख!

पंतप्रधान सहायता निधीसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून २५ लाख!

मुंबई दि. 30 —- राजकीय जीवनात काम करत असताना पंकजा मुंडे यांची सामाजिक बांधिलकी आणि वंचित घटकांसाठी त्यांची असलेली तळमळ नेहमीच दिसून आली आहे, त्यांच्या समाजाप्रती असलेल्या अशाच एका कर्तव्यदक्षतेचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी पंतप्रधान सहायता निधीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने २५ लाख रुपये इतका निधी त्यांनी दिला आहे.

संपूर्ण देशात कोरोना विषाणूने सध्या थैमान घातले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करून देशातील जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना करिता मोठा निधी जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला ‘पीएम केअर फंड’ साठी हाक दिली. या हाकेला तात्काळ प्रतिसाद देत पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे २५ लाख रुपयांचा निधी देऊ केला. कोरोना विरूध्दची लढाई जिंकण्यासाठी देशातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हिच आमच्यासाठी सध्या महत्वाची बाब आहे असे ट्विट करत त्यांनी प्रत्येकाला पुढे येऊन सढळ हातांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
••••


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन