नांदूर घाट मध्ये रक्तदान शिबीर संपन्न
नांदूर घाट मध्ये रक्तदान शिबीर संपन्न
नांदूर घाट (प्रतिनिधी) नांदूर घाट येथील आझाद हिंद मित्र मंडळाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात डॉ. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात 51 जणांनी रक्तदान केले.
देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात
कोरोनाग्रस्तांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे दानशूर रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे अवाहन राज्याचे आरोग्य मंत्री. राजेश टोपे यांनी केले होते. आरोग्य मंत्री टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशसेवा करण्याची संधी रक्तदानाच्या माध्यमातून नांदूरघाटवासियांना मिळाली असे समजून नांदुर घाट वाशीयांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे नियोजन शासनाच्या नियमानुसार काटेकोरपणे करण्यात आले होते. 3 फुटावर एक व्यक्ती या प्रमाणे नियोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीर विद्या तारळकर, आयुष्य शेख, शंकर तारळकर, विठ्ठल पुरी, निलेश तारळकर, व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा