डीवायएसपी भास्कर सावंत यांची जिव्हाळा अनाथांनालयास भेट

डीवायएसपी भास्कर सावंत यांची जिव्हाळा अनाथांनालयास भेट


बीड[प्रतिनिधी]:  शहरातील भाजी मंडई परिसरातील बीड नगर परिषद आणि रेणुका माऊली सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  सुरू असलेल्या जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्राला बीड जिल्हयाचे पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत आणि जेष्ट पत्रकार गंमत भंडारी यांनी भेट दिली.
  मागील काही वर्षापासून बेघर अनाथ लोकांसाठी बीड नगर परिषद आणि माऊली सेवाभावी  संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र ज्येष्ठ समाजसेवक राजू वंजारे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले. सध्या या अनाथालयात ७० निराधार अनाथ महिला-पुरुष वास्तव्यास आहेत. यापैकी काही दिव्यांग ,मनोरुग्ण व कुटुबीयांनी नाकारलेले बेदखल केलेले असे  लोक आहेत. या अनाथालयाला शहरातील दानशूर लोक मदत करत आहेत. शिवाय शहरातील अनेक प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते कार्यकर्ते आणि समाजसेवकांनी भेटी दिल्या आहेत. नुकतीच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट देवून पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यानंतर काल डीवायएसपी 
सावंत यांनी भेट दिली. या ठिकाणी असलेल्या सुविधांची पाहणी केली. एवढेच नव्हे तर स्वतः  येथील नागरिकांना जेवण वाढले. त्या नंतर या लोकांशी गप्पा केल्या. या वेळी सर्वांची अस्थेवाईक आणि प्रेमाने विचारपूस केली. त्यांच्या या कृतीने येथील निराधार अनाथ महिला-पुरुषांना खाकीतील देव माणसाचे दर्शन घडले.
   या वेळी जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक राजु वंजारे, संस्थेचे सचिव अभिजित वैद्य,सामाजिक कार्यकर्ते सलिम अध्यक्ष, नगरसेवक शेख, गोलु सर ,अमोल गलधर युवा मंचाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 


 दानशूरांनी मदतीचा हात द्यावा: राजू वंजारे
आमच्या जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला आतापर्यंत अनेक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांनी यांनी खूप मदत केली आहे. या केंद्रात पूर्वी संख्या कमी होती. परंतु आता या केंद्रात दुप्पटी पेक्षा अधिक संख्या वाढली आहे. त्यामुळे आता खर्च वाढल्यामुळे मदतीची गरज आहे. तरी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आम्हाला मदतीचा हात द्यावा. शिवाय आचारसंहितेच्या काळात मागील आठ दिवसापासून अनेक दानशूर व्यक्तींनी रोज रात्री अनाथांना अन्नदान करुन  मोलाचे सहकार्य केल्याची माहिती या वेळी राजू वंजारे यांनी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन