कराल एप्रिल फुल तर होईल जेल

कराल एप्रिल फुल 
तर होईल जेल

बीड प्रतिनिधी: 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन १ एप्रिल रोजी फेक मॅसेज व्हायरल करणार्‍यास पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे १  एप्रिल फुल साजर करणे एखाद्याला थेट जेलमध्ये सुद्धा पाठवू शकते करीता कोणी ही एप्रिल फुल चे मेसेज सोशल मीडियाद्वारे व्हायरल करू नये अन्यथा जेलची हवा खावी लागेल.  त्यामुळे यंदाचा एप्रिल फुल डे टाळणे हिताच्या ठरेल आहे.
 1 एप्रिल दिवस जवळ आला आहे. त्यादिवशी एप्रिल फुल डे असतो. त्याच दिवसाला ‘मुर्ख दिवस’ असे देखील म्हटले जाते. या दिवशी आपण काहीतरी ‘प्रँक’ करत असतो. तसेच, व्हॉट्सअ‍ॅपवरुन काहीतरी माहिती प्रसारित करुन एकमेकांची फसवाफसवी करत असतो. यंदा मात्र असा खोटारडेपणा करणे टाळावा लागणार आहे. कारण आपला व्हॉट्सअ‍ॅपवरील एप्रिल फुलचा एक मॅसेज तुम्हाला जेलची हवा दाखवू शकतो.
    सध्या भारतावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. या संकटात सर्वत्र लॉकडाऊन आहे. कोरोनाच्या धास्तीने प्रत्येकजण घरात असून मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आधिच अफवांचे सत्र सुरु आहे. त्या रोखताना पोलिसांच्या सायबर सेलच्या नाकीनऊ येत आहेत. त्यात आता एप्रिल फुल डे जवळ आला आहे. कोरोनामुळे सध्या परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. अशा परस्थितीत एकमेकांना खोटे मॅसेज पाठवून एप्रिल फुल करण्याच्या प्रयत्नात तुमच्या हातून गुन्हा घडू शकतो. कारण आता बीड पोलीस प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन फेक मॅसेज व्हायरल करणार्‍यांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. एप्रिल फुल साजरा करणे एखाद्याला थेट जेलमध्ये सुद्धा पाठवू शकते, त्यामुळे यंदाचा एप्रिल फुल डे टाळणे सर्वांच्याच हिताच्या ठरणार आहे.
ग्रुप अ‍ॅडमीन अडचणीत येणार
व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर खोटी माहिती पसरविल्यास ग्रुप अ‍ॅडमीन अडचणीत येणार आहेत. कारण ग्रुपवरील माहितीस सदस्याइतकेच अ‍ॅडमीन देखील  जबाबदार असतात. त्यामुळे एक-दोन दिवस व्हॉट्स अ‍ॅप हाताळताना विशेष दक्षता घेणे गरजेचं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन