आता बँका सकाळीच उघडणार!
आता बँका सकाळीच उघडणार!
बीड: सुधारित आदेशानुसार जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आता सकाळी अडीच तासांचाच वेळ असणार आहे. याशिवाय बँका आणि पेट्रोल पंप देखील सकाळी लवकरच उघडण्यात येणार आहेत.
आदेशात म्हटले की, जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंच्या सर्व आस्थापना वगळण्यात आल्या होत्या. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आचारसंहिता शिथील काळात सकाळ सकाळी 11 ते 3 या वेळेत खुली राहत होती. आता संचारबंदी शिथीलतेची वेळ बदलून सकाळी 7 ते 9.30 या वेळेत दुकाने खुली राहणार आहेत. तसेच, बँका आणि पेट्रोल पंपांसह प्रत्येक गोष्टीची वेळ ही सकाळी 7 ते 9.30 पर्यंतच असेल असे स्पष्ट शब्दात सांगत कोणताही गोंधळ होऊ नये, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा