दोन टिप्परसह दारु विक्रेत्यांवर एलसीबीच्या पथकाची कारवाई

दोन टिप्परसह दारु विक्रेत्यांवर एलसीबीच्या पथकाची कारवाई 

बीड : जमावबंदी, संचारबंदी असतांना अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन हायवा टिप्पर व अवैध दारु विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शनिवारी (दि.28) केज तालुक्यातील विडा परिसरात केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भरत राऊत यांच्या आदेशाने केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैद्य धंदयावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.आनंद कागुणे यांच्यासह पोलीस कर्मचारी गंपू पवार, झुंबर गर्जे, गोविंद काळे, बालाजी दराडे हे हिवरा पहाडी मार्गे विडा परिसरात गेले. यावेळी विडा येथून दोन दुचाकीवरून सहाजण देशी दारू विक्री करण्यासाठी बीड येथे घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. कोरडेवाडी शिवारातील हनुमान वस्ती जवळील पुलाजवळ सापळा लाऊन दुचाकीवर पांढर्‍या पोत्यात देशी दारू घेऊन जात असलेल्या भीमा लक्ष्मण मस्के, अमोल लक्ष्मण मस्के, राजीव एकनाथ वाघमारे, जालिंदर राम हिरवे (रा.बीड) यांना ताब्यात घेतले. भैया उर्फ अशोक सुखदेव भाले व राजू केरबा साठे हे दोघेजण पसार झाले. यावेळी दोन दुचाकीसह 1 लाख 43 हजार 280 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत केज पोलीसात गुन्हा दाखल केला. या दरम्यान विडा-कोरडेवाडी रस्त्यावरून अवैध्रित्या वाळूची वाहतूक करत असलेले दोन हायवा टिप्पर पकडून जप्त करत केज पोलीस ठाण्यात आणून लावले आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोना.श्रीराम चेवले करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन