धनंजय मुंडेंचा परळीकरांसाठी आणखी एक निर्णय; डाबीसह आता दाऊतपुरवरूनही होणार वीजपुरवठा**विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ना. मुंडेंनी केले कौतुक*

*धनंजय मुंडेंचा परळीकरांसाठी आणखी एक निर्णय; डाबीसह आता दाऊतपुरवरूनही होणार वीजपुरवठा*

*विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ना. मुंडेंनी केले कौतुक*

परळी (दि.३१) ----: परळी शहराला वीजपुरवठा करणाऱ्या डाबी येथील १३२ केव्ही सबस्टेशन मध्ये काही फॉल्ट झाला की परळी शहर अंधारात असायचं! परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आता यावर पर्यायी उपाय काढला आहे.

आता परळी शहरासाठी सिमेंट फॅक्टरीकडे येणारी दाऊतपूर ३३ के.व्ही. वीज लाईन कालरात्री देवी सबस्टेशनला जोडण्यात येणार आहे.

यामुळे डाबी सबस्टेशनला आता पर्यायी व्यवस्था होणार असून, डाबी कडील वीज पुरवठ्यात काही अडथळा निर्माण झाला तरी परळीकरांना अखंडित वीज मिळणार आहे.

याबाबत ना. धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आज (दि.३१) बीड महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सरग व अंबेजोगाई विभागाचे कार्यकारी अभियंता कुरेशी यांनी या कामाची पाहणी केली यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता जिलानी व कटके हेही उपस्थित होते.

सध्या परळी शहराला डाबी १३२ केव्ही या एकाच सबस्टेशनवरून वीज पुरवठा केला जातो. या सबस्टेशनला काही अडथळा निर्माण झाला तर परळी शहरात वीज पुरवठा करण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्था नाही. मात्र आता धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून लवकरच ही व्यवस्था होणार असून, त्यानंतर दोन्ही पैकी एकही फीडरचा वीज पुरवठा खंडित झाला तर दुसऱ्या पर्यायी व्यवस्थेमुळे परळीकरांना अंधारात राहावे लागणार नाही.

या कामाला लवकरच सुरुवात होत असून युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याबाबत सूचना अधीक्षक अभियंता सरग यांनी परळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

*विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मुंडेंनी केले कौतुक*

दरम्यान गेल्या तीन - चार दिवसात परळीसह परिसरात सातत्याने होत असलेल्या वादळी वारा व पावसाने अनेक ठिकाणी विद्युत खांब व तारा तुटून अनेकवेळा वीज पुरवठा खंडित झाला. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करत लॉकडाऊन सह कोरोनाच्या या कठीण काळातही काही वेळातच वीज पुरवठा पुन्हा नियमित केला. यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ना. धनंजय मुंडे यांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच दाऊतपूर ३३ के.व्ही. लाईन मार्फत पर्यायी वीज पुरवठा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल असा विश्वासही ना. मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन