कीर्तीताई दुग्गड मैत्रीणींचा बी.सी ग्रुपमुळे जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला मिळाले बळ !
कीर्तीताई दुग्गड मैत्रीणींचा बी.सी ग्रुपमुळे जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला मिळाले बळ !
*आत्माराम वाव्हळ|बीड*
बीड शहरातील भाजी मंडई परिसरातील बीड नगर परिषद आणि रेणुका माऊली सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने बेघर अनाथ मतिमंद अपंग व्यक्तींसाठी जिव्हाळा बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात सुरूवातीला बीड शहरातील विविध भागातून २५ ते ३० बेघर अनाथ मतिमंद अपंग भोळसर वेडसर समाजाने कुटूबांने सोडून दिलेल्या व्यक्तींना आधार दिला. या आधार केंद्राचे व्यवस्थापक राजू वंजारे यांनी कुटुंबातील कर्त्यापुरुषा प्रमाणे या बेघर निवारा केंद्रातील सदस्यांचा सांभाळ करायला सुरुवात केली. त्यांच्या या कार्याची शासनासह समाजसेवी संस्थांनी दखल घ्यायला सुरुवात केली. समाजातील थोर व्यक्तीने नुसती दखलच घेतली नाही तर अनेक दानशूर व्यक्तींनी भरभरून मदतीचा हात पुढे केला आहे. दानशूर व्यक्तीं कडून मिळालेल्या मदतीने राजू वंजारे यांनी निराधार बेघर लोकांची सेवा करण्यात तत्पर होते. अखंडितपणे त्यांनी सेवेचा महायज्ञ सुरु केला. परंतु मागील काही दिवसापासून जगातील जवळपास सर्वच देशात "करोना"व्हायरसने थैमान घातले आहे. परदेशात या आजाराने अनेकांचा बळी घेतला. याचा प्रादुर्भाव भारत देशात होऊ लागल्याने कोरोना रोगाचा प्रतिबंध करण्याच्या पार्श्वभुमीवर राज्यात लॉक डाऊन करण्याचा कठोर आणि धाडसी निर्णय
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला. त्या नंतर देशात १५ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन परिस्थिती कायम ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारत देशात लॉक डाऊन परिस्थिती निर्माण झाली आणि जिव्हाळा बेघर निराधार केंद्राला येणाऱ्या मदतीचा ओघ कमी झाला. या जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील लोकांच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यातच अचानक रोडच्या कडेला सापडलेले २० ते २५ बेघर निराधार वेडसर भोळसर लोकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या जिव्हाळा निवारा केंद्रात आणूण सोडण्यात आले. त्यामुळे या केंद्रातील निराधारांची संख्या ६०ते ७० झाली आहे. संचारबंदीच्या काळात या सर्व लोकांना खाऊ घालण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कीर्तीताई यांच्या मैत्रीणींचा बी.सी ग्रुपने बेघरांसाठी काही मदत हवी आहे का ? अशी विचारणा केली. वास्तविक रित्या अडचणीच्या काळात कीर्तीताई दुग्गड यांच्या मैत्रीणींचा बी.सी ग्रुप धावून आला. सुरुवातीला या जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला जीवनावश्यक वस्तू किराणा सामान दिले. त्यांच्या या मदतीमुळे जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील लोकांना पोटभर खाण्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपातला मिटला. किराणा सामान देऊन खाण्याचा प्रश्न भेटल्यानंतर कीर्तीताई यांच्या मैत्रीणींचा बी.सी ग्रुपने शांत राहिला नाही. तर त्यांनी या केंद्राला आणखीन काय हवं असे विचारत मदतीचे आश्वासन दिले. कोरोना गंभीर आजाराच्या पार्श्वभूमीवर या निवारा केंद्रातील बेघर, अनाथ , रोडवर फिरणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून या केंद्राची संपूर्ण इमारत या मैत्रीणींचा बी.सी ग्रुपने सँनीटायझर करून दिली. शिवाय या सर्वांसाठी 100 मास्क दिले. कीर्तीताई दुग्गड यांच्या मैत्रीणींचा बी.सी ग्रुपमुळे या जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला मोठा हातभार लागला आहे. अन्यथा या लोकांना जेवण देणे कठीण झाले असते. कीर्तीताई दुग्गड यांच्या मैत्रीणींचा बी.सी ग्रुपमुळे आमच्या जिव्हाळा बेघर निवा-याला बळ मिळाल्याची भावना व्यवस्थापक श्री.राजू वंजारे यांनी संघर्ष यात्राचे संपादक श्री. आत्माराम वाव्हळ यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा