दुचाकी स्लिप होऊन गंभीर जखमी झालेल्या त्या बँक कर्मचाऱ्याला बीड ग्रामीण पोलिसांनी केली मदत

दुचाकी स्लिप होऊन गंभीर जखमी झालेल्या त्या बँक कर्मचाऱ्याला बीड ग्रामीण पोलिसांनी केली मदत

बीड प्रतिनिधी:
जामखेड येथील महाराष्ट्र बँकेतील एक कर्मचारी दुचाकीवरून बीडला येत असताना त्यांची दुचाकी नगर रोडवर स्लीप झाल्याने अपघात झाला. या अतघातात ते गंभीर जखमी झाले असून जिल्हा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
  या बाबत अधिक माहिती अशी की जामखेड येथील महाराष्ट्र बँकेत कार्यरत असणारे कर्मचारी आपल्या दुचाकीवरून बीडला येत होते. दरम्यान त्यांची दुचाकी नगर रोडवरील आ. संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्या समोर येताच स्लीप झाल्याने अपघात झाला. सदरील दुचाकीस्वार कर्मचारी रोडवर आदळल्याने तयाच्या डोक्याला, नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या बीड शहरामध्ये करोना प्रादुर्भाव वाढु नये या करिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रस्त्यावर कुणीच नसल्याने सदरील जखमीला  लवकर मदत मिळत नव्हती. दरम्यान  बीड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल सानप, वाहन चालक सुरवसे, हे नगर रोडवर पेट्रोलिंग करत असताना त्यांना सदर अपघाताचे दृश निदर्शनास आले.
 तत्काळ त्यांनी या जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या कर्मचाऱ्यांच्या बॅंक ओळखपत्रावर परमेश्वर तांदळे असे नाव आहे.
दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत. आपण घरातच बसा संदेश देत व माणुसकीचे दर्शन घडविले. बीड  पोलिसांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन