बी.सी.ग्रुपच्या वतीने जिव्हाळा बेघर, निराधार केंद्राला किराणाची मदत

बी.सी.ग्रुपच्या वतीने जिव्हाळा बेघर, निराधार केंद्राला किराणाची मदत 

बीड/प्रतिनिधी:
 शहरातील भाजी मंडई परिसरातील बीड नगर परिषद आणि रेणुका माऊली सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  सुरू असलेल्या जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्राला बी.सी ग्रुपच्या वतीने  किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.
मागील काही वर्षापासून बेघर अनाथ लोकांसाठी बीड नगर परिषद आणि माऊली सेवाभावी  संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्र ज्येष्ठ समाजसेवक राजू वंजारे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले. सध्या या अनाथालयात ६०ते ७० निराधार अनाथ महिला-पुरुष वास्तव्यास आहेत. 
   आज सर्व जगभरात "करोना"व्हायरस ने थैमान घातले आहे. कोरोन रोगाचा प्रतिबंध करण्याच्या पार्श्वभुमीवर राज्यासह देशात लॉक डाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लॉक डाऊन परिस्थिती या जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील लोकांच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच अचानक रोडच्या कडेला सापडलेले २०ते२५ बेघर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या 
जिव्हाळा निवारा केंद्रात सोडण्यात आले. त्यामुळे या केंद्रातील निराधारांची संख्या ६०ते ७० झाली आहे. संचारबंदीच्या काळात या सर्व लोकांना खाऊ घालण्याचा मोठा गंभीर  प्रश्न निर्माण झाला असताना 
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांच्या बी.सी ग्रुपच्या किर्ती  दुग्गड  यांनी बेघरांसाठी काही मदत हवी आहे का ? असे विचारत  किराणा सामानाची भरभरून मदत केली. ही मदत मिळाल्यामुळे मोठा हातभार लागला अन्यथा सर्व लोकांना जेवण देणे कठीण झाले असते असे व्यवस्थापक राजू वंजारे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन