संचारबंदीच्या काळात काही किराणा दुकानदाराकडून ग्राहकाची लूट
संचारबंदीच्या काळात काही किराणा दुकानदाराकडून ग्राहकाची लूट
*नागरिकांतून संताप
*जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावे-मागणी
बीड | राज्यासह देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाच्या पार्श्र्वभूमी देशात २१ दिवस संचारबंदीचा आदेश लागू केला. या संचार बंदीचा फायदा घेत जिल्ह्यातील काही किराणा दुकानदाराने किरणा सामानाचे भाव वाढवून सर्वसामान्यांची लूट करण्यास सुरुवात केली. कोरोना सारख्या भयानक महामारीच्या काळात चढ्या भावाने किराणा सामानाची विक्री करणे म्हणजे मड्यावरच लोणी खाण्याचा प्रकार आहे. किराणा दुकानदारांच्या या भूमिकेमुळे नागरिकांतून संताप होत आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
जगासह देशात आणि राज्यात कोरोना नावाच्या आजाराने मोठे थैमान घातले आहे. या आजारापासून संरक्षण मिळण्याच्या उद्देशाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारने राज्यासह, देशात 21 दिवस (आचार संहिता) लॉक डाऊन ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार राज्यामध्ये 15 एप्रिल पर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तू शिवाय कुठल्याही आस्थापना चालू राहणार नाही असे आदेशित करण्यात आले आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये नागरिकांना खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी काही काळ आचार संहिता शिथील करण्यात आली आहे. या काळात नागरिक जिवनावश्यक वस्तू खरेदीसाठी किराणा दुकानवर गेले असता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी असलेले किराणा वस्तूंचे भाव बदलले असून हे किराणा सामान चढ्या भावाने विक्री होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे.
बीड शहरातील मोंढ्यातील काही होलसेल किराणा दुकानदारांनी अन्नधान्याचा तुटवडा असल्याचे भासवून किराणा सामानाच्या भावात मोठी वाढ केल्याचे निदर्शनास आले आहे. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी तुरदाळ 75 रुपये किलो होती. आचारसंहितेच्या काळात सदर तूरदाळ 100 ते 110 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. तसेच शेंगदाणे, ज्वारी, गहू, साखर आदी जीवनावश्यक वस्तूचीही चढ्या भावाने विक्री करत आहेत . याबाबत नागरिकांनी दुकानदाराला विचारणा केली असता पटत असेल तर घ्या माल शिल्लक नाही असे उत्तर दिले जाते. जर होलसेल दुकानात असा प्रकार घडत असेल तर किरकोळ विक्री करणा-या दुकानदारांचे न विचारलेले बरे हे किराणा दुकानदार या पेक्षाही अधिक चढ्या भावाने विक्री करत असतील ही शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना नाईलाजास्तव चढ्या भावाने किराणा सामानाची खरेदी करावी लागत आहे. याबाबत जिल्हाधिकारी रेखावार साहेबांनी लक्ष घालून नागरिकांचे होणारी लूट थांबवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा