जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याने पेट्रोलपंपला ठोकले सील

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाचे  उल्लंघन केल्याने पेट्रोलपंपला ठोकले सील

बीड : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड शहरातील एका पंपचालकावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.28) दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे पंपचालकांत खळबळ उडाली आहे. पंपचालकावर केलेली ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे.          फारोकी एजन्सीकडे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारतीय पेट्रोल पंप आहे. अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करणार्‍यांनाचा पेट्रोल देण्यात यावे. खाजगी नागरिकांना पेट्रोल देवू नये असे जिल्हाधिकारी यांचे आदेश होते. मात्र आदेश असतांनाही खाजगी नागरिकांना पेट्रोल देवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्यामुळे 188 नुसार बीड तहसिलदार किरण आंबेकर यांनी  सदरील पेट्रोल पंप सील केला. पेट्रोल पंपावर कारवाई करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या कारवाईमुळे पंपचालकांत खळबळ उडाली आहे. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन