तहसिलदार डाॕ.प्रतिभा गोरे यांच्या उपस्थितीत आधार मल्टिस्टेटच्या वतीने भटक्या विमुक्त लोकांना राशन वाटप
तहसिलदार डाॕ.प्रतिभा गोरे यांच्या उपस्थितीत आधार मल्टिस्टेटच्या वतीने भटक्या विमुक्त लोकांना राशन वाटप
माजलगाव ( प्रतिनिधी ) येथील आधार मल्टीस्टेट च्या वतीने च
पालावरील भटक्या लोकांना तहसिलदार डाॕ.प्रतिभा गोरे यांच्या उपस्थितीत जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. या वेळी आधारचे चेअरमन अॅड सुनिल सौंदरमल यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.
अॅड.सुनिल सौंदरमल हे आपल्या आधार मल्टीस्टेटच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी सतत पुढाकार घेत आहेत. सध्या देशावर
आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्यासह देशात लॉक डाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. या लाॕक डाऊन परिस्थितीत ज्यांचे हातावर पोट आहे अशा गोर गरिब मजुर भटक्यानां काम धंदा नसल्याने त्याच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ येत आहे. या गोरगरीब जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन या कुटुंबातील नागरिकांना खाण्याच्या वस्तु मोफत वाटण्याचा उपक्रम हाती घ्यावा असे आवाहन
तहसिलदार डाॕ.प्रतिभा गोरे यांनी केले. तहसिलदार डाॕ.प्रतिभा गोरे यांच्या अवाहानानुसार आधारचे चेअरमन अॅड. सुनिल सौंदरमल यांनी स्वत: पुढाकार घेऊन सर्वांना एकत्रीत करून तहसिलदार डाॕ.प्रतिभा गोरे यांच्या उपस्थितीत
आज केसापुरी कॕम्पवरील भटके लोकांना जीवनावश्यक वस्तू पीठ,दाळ, तेल ,बिस्किट यांचे वाटप करण्यात आले. मंडळ अधिकारी पद्माकर मुळाटे यांच्यासह विजय राऊत, अशोक डोंगरे भिमराव जाधव आदी उपस्थित होते.
तहसिलदार डॉ. डाॕ.प्रतिभा गोरे यांचे सामाजिक भान
माजलगावच्या कर्तव्यदक्ष, दबंग तहसिलदार श्रीमती डाॕ.प्रतिभा गोरे या कोरोना महामारिच्या परिस्थितीत अहोराञ फिरत आहेत. आजच्या या कठीण परिस्थितीत कोणत्याही नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी त्या जातीने लक्ष देत आहेत. कुणावर उपासामारीची वेळ येवु नये म्हणुन त्यांनी स्वत: पुढाकर घेत सामाजिक संस्थांना मदतीचे अवाहन केले. त्यांच्या आवाहनानुसार अनेक नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. एकंदरीतच तहसिलदार डाॕ.प्रतिभा गोरे यांना सामाजिक भान दिसुन येत आहे. त्यांनी हाती घेतलेल्या या सामाजिक उपक्रमा बद्दल त्यांना आणि आधारचे चेअरमन अॅड. सुनील सौंदरमल यांना धन्यवाद दिले जात आहेत.
अभिनंदन
उत्तर द्याहटवा