सोशल मीडियावर अफवा; दोघांवर गुन्हा

सोशल मीडियावर अफवा; दोघांवर गुन्हा 

बीड: सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये जाणिवपूर्वक द्वेषभाव व तेढ निर्माण करण्याच्या हेतून पोस्ट व्हायरल केली. या प्रकरणी पोस्ट व्हायरल करणार्‍या तरुणासह सदरील ग्रुप अ‍ॅडमीनवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधाकर आव्हाड या तरुणाने कर्नाटक राज्यातील एक जातीय तेढ निर्माण करणारा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट केला. यामुळे पाटोदा पोलीस ठाण्यात सुधाकर आव्हाड व ग्रुप अ‍ॅडमीन राहुल शाहुराव जाधव यांच्यावर कलम 505 (2), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना संदर्भातील अफवा व कुठल्याही जातीय तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करु नये. आपल्यावर बीड पोलीसांच्या सायबर सेल विभागाची नजर आहे. अन्यथा कडक कारवाई करण्यात यईल असे बीड पोलीस दलाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन