वीज पडून एक शेतकरी ठार एक जखमी
वीज पडून एक शेतकरी ठार एक जखमी
माजलगावः तालुक्यातील पिंपळगाव (नाकले) शिवारात शेतातील गहू काढत असतांना विजेच्या कडकडाट होऊन वीज पडली. यात एक 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर एकास विजेचा धक्का बसल्याने तो बेशुद्ध असून त्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव (नाकले) शिवारात अवकाळी वातावरणाचा फटका बसला. संपूर्ण माजलगाव तालुक्यात दुपारी 3 वाजण्याच्या सुमार पासून मोठ्या प्रमाणावर मेघ गर्जना आणि विजेच्या कडकडाट सुरु झाला. सद्य स्थितीत शेतकऱ्यांची शेतमालाच्या काढणीसाठीची लगबग सुरु आहे. त्यातच पिंपळगाव (नाकले) शिवारात रुपेश माने (वय 30), झनक काळे (वय 40) हे शेतात गहू काढत होते. यावेळी रुपेश माने यांच्या अंगावर वीज कोसळली त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर झनक काळे यांना विजेचा धक्का बसल्याने त्यात ते बेशुद्ध झाले असून त्यांच्यावर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा