तंबाखू, सिगारेटच्या गोडाऊनवर पोलीसांचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तंबाखू, सिगारेटच्या गोडाऊनवर पोलीसांचा छापा; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड प्रतिनिधी : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली असतांना  बीड शहरातील दोन नामांकित दुकानदार खुलेआम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतांना आढळून आले. मंगळवारी (दि.31) सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा मारला. यावेळी दीड लाखांचे तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना तंबाखू शिवाय कुठलेच काम होत नाही अशा तलफीवाल्यांची मोठी पंचाईत होणार आहे.
  शहरातील मोंंढा परिरसरात असलेले सार्थक सेल्स व खुशी टे्रडींग या दोन दुकानामध्ये मोठ्या प्रमाणा तंबाखुजन्य पदर्थांची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावेळी त्या ठिकाणी पाळत ठेवून छापा मारला असता सार्थक सेल्स दुकानामध्ये सुर्याछाप तंबाखू,कोंबडा बीडी, जर्दा तंबाखू, ए-10 कंपनीचे सिगारेट, गोल्डफ्लॅक सिगारेट, गायछाप असा 1 लाख 39 हजार 660 व खुशी ट्रेडिंग दुकानात 1 हजार 600 रुपयांचा गायछाप तंबाखू जप्त करण्यात आला. या प्रकरणी सार्थक सेल्सचे मालक रविंद्र यशवंत काजळे व खुशी ट्रेडिंगचे मालक श्रीकिसन नारायणदास तोशिनवार यांच्यावर पेठ बीड पोलीसात 188 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भरत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख सपोनि.आनंद कांगुणे, पोना.गर्जे, पवार, हांगे, पोशि.काळे व चालक पोना.गर्जे यांनी केली. या कारवाईमुळे मोंढा परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन