जिल्हाधिकारी रेखावार यांची कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

जिल्हाधिकारी रेखावार यांची कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
बीड : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेत जिल्हा प्रशासन व्यस्त असल्याचा वाळूमाफियांनी फायदा उठवला आहे. माफियांनी गेवराई तालुक्यात गुंतेगाव परिसरात वाळूचा मोठा साठा केला होता. याबाबत बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना माहिती मिळाली होती, त्यानुसार त्यांनी झाडाझडती घेतली असता वाळूसाठ्यासह अन्य साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गेवराई तालुक्यातील गुंतेगाव परिसरात वाळू माफियांनी साठा करण्यास सुरवात केल्याची माहिती जिल्हाधिकार्यांना मिळाली होती. त्यांनी पाहणी केली असता नदीपात्रात वाळूचा साठा, त्याठिकाणी चार टॅ्रक्टर, एक ट्रॉली आढळून आली. याशिवाय अन्य काही जप्त करण्यात आले असून गेवराई पोलिसांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाईचे त्यांनी निर्देश दिले आहेत. घटनास्थळी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्यास महसूलचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा