बीडचे तीन पोलीस कर्मचारी महासंचालक पदकाचे मानकरी
बीडचे तीन पोलीस कर्मचारी महासंचालक पदकाचे मानकरी
बीड : पोलीस दलामध्ये 15 वर्षे निष्ठापूर्वक आणि तत्पर सेवा बजावल्याबद्दल पोलीस महासंचालकांतर्फे पदक देऊन कर्मचार्यांना गौरव केला जातो. यंदा जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचारी महासंचालकांच्या पदकाचे मानकरी ठरले आहेत. पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि.30) राज्यातील 8090 कर्मचार्यांना पदके जाहीर केली. यामध्ये बीड जिल्हा पोलीस दलातील तीन कर्मचार्यांचा समावेश आहे.
महामार्ग विभागातील पोलीस नाईक गणेश दुधाळ, स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार मोहन क्षीरसागर, पोलीस नाईक नरेंद्र बांगर हे महासंचालक पदकाचे मानकरी ठरले आहेत. पोलीस दलात 15 वर्षे उल्लेखनीय कामगिरी करुन आव्हानात्मक गुन्ह्यांच्या तपासात मोलाचे योगदान देणार्या कर्मचार्यांचा महासंचालक पदके प्रदान करुन लवकरच गौरव होणार आहे. या यशाबद्दल पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांनी तिन्ही कर्मचार्यांचे स्वागत केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा