राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांची रिक्त जागा मुख्यमंत्र्याना का दिली नाही?
राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांची रिक्त जागा मुख्यमंत्र्याना का दिली नाही?
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वावरुन भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात राजकारण रंगले आहे. त्यावरुन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं भाजपला वाटत असून त्यातूनच त्यांचे खटाटोप सुरू आहेत, असा थेट आरोप केला. त्या आरोपाला भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांनी देखील जाऊन भेट घेत आक्रमक झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्त्याची शिफारस मान्य करुन तातडीने नियुक्ती देण्याची मागणी राज्यपालाकडे केली होती. त्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं भाजपला वाटत असा आरोप केला. या आरोपाला प्रत्युत्तर देणारे ट्वीट भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, भाजपावर टीका करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयाने रिकामी झालेली जागा मुख्यमंत्र्याना का दिली नाही? ते केलं असत तर आज मुख्यमंत्री आमदार असते. असे म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनंजय मुंडे यांची रिक्त जागा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला देऊन त्यांच्या जागी संजय दौंड यांची नियुक्ती केली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा