राज्यपालांनी निर्णय न घेतल्यास पुन्हा शपथविधी

मुंबई / प्रतिनिधी

राज्याच्या मंत्रमंडळाने राज्यपालनीयुक्त सदस्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या नावाची शिफारस केली असताना राज्यपाल यावर काहीच निर्णय घेत नसल्याने महाविकास आघाडीचे नेते संतप्त झाले असून त्यांनी आज राज्यपालाची भेट घेऊन पुन्हा एकदा हीच मागणी केली आहे.राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी कला साहित्य क्षेत्र पाहिजे तर उद्धव ठाकरे छायाचित्रकार आणि संपादक आहे पण जर तेही मेनी न केल्यास सरकार पुन्हा एकदा ठाकरेंना नेता निवडतील आणि त्याच्यासह सर्वच मंत्रिमंडळाचा शपथविधी घेतला जाईल व पुन्हा ६ महिन्याचा अवधी असेल असे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नमूद केले आहे.
राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाले असून राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं की, “जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिलं आहे. बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळदेखील यावेळी उपस्थित होते.जयंत पाटील यांनी सांगितलं आहे की,जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिलं आहे. राज्य मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव दिला आहे तो मान्य करावा अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन