गुपचुप लग्न करून तो वधुसह रुग्णवाहीकेने घरी आला
बीड प्रतिनिधी
देशव्यापी लॉकडाउन दरम्यान देशात विविध ठिकाणी अडकलेले लोक आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची चिंता देखील समजण्यासारखी आहे. मात्र, काही लोक घरी जाण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतानाही दिसत आहेत. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका तरूणाला कसेही करून लग्न करायचे होते. त्याने शक्कल लढवत वडिलांच्या आजारपणाची बतावणी केली आणि रुग्णवाहिकेतून दिल्लीला पोहोचला. तेथेच त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर तो आपल्या पत्नीला रूग्णवाहिकेत बसवूनच घरी घेऊन आला. मात्र, आता त्याचे संपूर्ण कुटुंब क्वारंटीन ठेवण्यात आले आहे.अहमद असे या २६ वर्षीय तरुणाचे नाव असून दिल्लीला जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स बुक केली. वडिलांच्या आजारपणाचा बहाणा सांगितल्यानंतर त्याला ड्रिप लावून स्ट्रेचरवर ठेवले गेले. वाटेत आलेल्या अनेक चेकपोस्ट आणि पोलिस चौक्यांवर त्याने खोटे बोलून, तसेच वडिलांच्या आजाराचे निमित्त सांगत अहमद दिल्लीला पोहोचला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा