पीआय साहेबांच्या प्रेमापोटी दबंगगिरी करणार्या महिलेविरोधात गुन्हा
पीआय साहेबांच्या प्रेमापोटी दबंगगिरी करणार्या महिलेविरोधात गुन्हा
अंमळनेर (प्रतिनिधी) : पोलिस निरीक्षका यांच्याविरुद्धची नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे केलेली तक्रार मागे घे, नाही तर जिवंत मारून टाकीन,’ असे म्हणत पीआय साहेबांच्या प्रेयसीने एका तक्रारदार महिलेला लाथाबुक्क्यानी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे घडला. सदर महिलेविरोधात अंमळेनर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
ज्योती धनराज भोई (रा. पैलाड) यांनी अंमळनेर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योती भोई शुक्रवारी सकाळी सहा वाजता घरात झोपलेल्या होत्या. त्याचवेळी हातात लाकडी दांडके घेऊन एक महिला तेथे आली. ज्योतीच्या आईला तिने मैत्रीण असल्याचे सांगितले व ज्योतीला पोलिस निरीक्षक यांची पत्नी असल्याचे सांगितले. मात्र, ज्योती यांनी, तू त्यांची पत्नी नाही. मी त्यांना एका कार्यक्रमात पाहिले आहे,’ असे सांगितले. त्यावर तिने, आपण वाघ यांची प्रेयसी शबनम ऊर्फ शमिना मोमीन (रा. केडगाव, नगर) असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक वाघ यांच्याविरुद्ध नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे केलेली तक्रार मागे घे, नाही तर जिवंत मारून टाकीन,’ असे सांगून शिवीगाळ केली, तसेच लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने ज्योती यांना मारहाण केली. नंतर दुचाकीवरून (एमएच 16 सीएम 7365) ती निघून गेली. तक्रार मागे घेत नाही तोपर्यंत जाणार नाही, असे सांगून, वारंवार घरी येऊन शिवीगाळ केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. अंमळनेर पोलिसांनी शबनम ऊर्फ शमिना हिच्याविरुद्ध अनधिकाराने दुसर्याच्या घरात प्रवेश करणे, अश्लील शिवीगाळ, मारहाण, जिल्हाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकराची नगर आणि जळगाव जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा