जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन


जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत गुरुवारी (दि.30) निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एन.एच. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत अमिताभ बच्चन यांनी ‘तो गेलाय.. ऋषी कपूर गेलाय.. आणि मी उध्वस्त झालोय’; केलेलं ट्विटचा स्क्रिन शॉट एएनआय या सरकारी वृत्तसंस्थेनं शेअर केला आहे. 

ऋषी कपूर यांच्यावर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार करण्यात आल्यानंतर ते भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील ही दुसरी दु:खद बातमी समोर येत आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनेत्यांनी ट्विट करत शोक व्यक्त केले आहेत. तसेच त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

ऋषी कपूर यांनी जवळपास 92 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ ‘हीना’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. 11 महिने 11 दिवस न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे. त्यांच्या निधनाने बॉलीवूडवर सलग दुसर्‍या दिवशी शोककळा पसरली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन