सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल !
बीड | कोरोना व्हायरसच्या संकटात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या अफवाचे व्हायरस जीव घेणे ठरत आहेत याला रोखने हे पोलिसांसमोरील आवाहन आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून फेसबुक व्हॉट अँप वर अफवा पसरवणारे समाजकंटक काही कमी नाहीत,अशा अफवाखोरराना बीड पोलिसांनी थेट तुरुंगाची हवा खावी लागली. सोशल मीडिया संदर्भात महाराष्ट्रात २५० गुन्हे नोंद आहेत पुणे -२० मुंबई-१८ तर एकटया बीड जिल्ह्यात सर्वात जास्त २८ गुन्ह्याची नोंद आहे , यामुळे आता बीड मधून अफवाखोर हद्दपार होण्यास ही ब्रँच परिणामकारक ठरली आहे. २४ तास समाज माध्यमावर लक्ष ठेवनारी बीड पोलिसांची तिसरी सायबर ब्रँच कामगिरी केली आहे.
फेसबुक,व्हॉट अप ,ट्विटर टिक टॉक ,यासह इतर माध्यमावर पोस्ट टाकण्या पूर्वी आणि शेअर करण्यापूर्वी ही बातमी पहा. रिकामा उद्योग करत पोलिसाचे काम वाढवनारे महानग बऱ्याच वेळा अमुक अमुक गावात कोरोना चा रुग्ण सापडला. न्यूज पेपर आणि खोट्या बातम्याचे फोटो स्किन शॉट व्हाट्स अँप वर फिरल्यामुळे अनेक अनर्थ घडले, बीड मध्ये लॉक डाऊन च्या सुरुवातीला अफवांच पेव फुटले होत. हे रोखण्यासाठी बीड पोलिसांनी सायबर टीम तयार केली यात एक अधिकारी आणि सहा कर्मचारी अशी चोवीस तास बीड जिल्हयातील सोशल माध्यमावर लक्ष ठेवून आहेत कालपर्यंत (२९ एप्रिल) जिल्हयात २८ गुन्हे दाखल झाले आहेत,तब्बल ३१अफवा खोरावर कारवाई केली असे पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी सांगितले.
कोरोना सोबत लढाई लढताना त्यापेक्षा खतरनाक अफवाचा व्हायरस आहे, यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकताना अगोदर खात्री करावी यातून समाजच नुकसान होणार तर नाही ना असा प्रश्न स्वतःला विचारा डोळेबंद करून गांधारी सारखी डोळ्यावर पट्टी बांधून कोणतेही पोस्ट टाकू नका. अन्यथा कारवाई आणि जेल तुमची वाट पाहतोय असा इशारा इशारा पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी दिला. बीड पोलिसांचा तिसरा डोळा सोशल माध्यमातील हालचालीवर बारीक लक्ष ठेवले आहे. सोशल मीडियाचा प्रोफाइल तुमचा असलं तरीही मात्र तुम्ही समाजामध्ये वावरत आहे याचे भान राहू द्या कोरोना सारख्या कठीण काळात सामाजिक द्वेष खोट्या बातम्या आणि अफवांचे पेव फोडाल तर याद राखा असा इशाराच बीड पोलीस देत आहे,
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा