सपोनि.सचिन पुंडगेला तीन दिवसाची कोठडी
सपोनि.सचिन पुंडगेला तीन दिवसाची कोठडी
बीडः गुन्हेगारीला आला घालण्यासाठी गुन्हेगारांना कडक शासन करायचे. कोठडीत ठेवायचे.. पण पैशाच्या मोहामुळे स्वतः कोठडीत थांबण्याची वेळ आली. वाळूचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी व पकडलेल्या टिप्परला पुढे सहकार्य करण्यासाठी नेकनूरचे ठाणेदार सपोनि.सचिन पुंडगे, पोहेकॉ.माणिक तांदळे यांना पंधरा हजारांची लाच घेतांना बुधवारी रंगेहाथ पकडले. गुरुवारी (दि.30) दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची (दि.3 मे पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेकनूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे व पोहेकॉ.माणिक तांदळे हे वाळूचे ट्रॅक्टर सोडवण्यासाठी पंधरा हजारांची लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे प्राप्त झाली होती. बुधवारी सायंकाळच्या सुमारास सापळा रचत दोघांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची (दि.3 मे पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा