औरंगाबादमध्ये एचडीएफसी बँकेच्या टीव्ही सेंटर शाखेला आग!
औरंगाबादमध्ये एचडीएफसी बँकेच्या टीव्ही सेंटर शाखेला आग!

औरंगाबादमध्ये एचडीएफसी बँकेच्या टीव्ही सेंटर शाखेला आग!
औरंगाबाद : एचडीएफसी बँक टीव्ही सेंटर शाखेला गुरुवारी (दि.३०) सकाळी आग लागल्याची घटना घडली. दरम्यान अग्निशमन विभागाच्या सहकार्याने आग विझवण्यात आली. सकाळी ११ च्या दरम्यान बँकेला आग लागल्याची घटना घडली. जवळपासचे नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांना आग विझवणे शक्य नसल्याने अग्निशमन विभागाच्या कार्यालयाला घटनेची माहिती दिली.
काही वेळात अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. आगीमुळे बँकेतील जास्त नुकसान झाले नाही अशी माहिती बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारगावकर यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा