बीड जिल्ह्यातील 116 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 2 जणांचे अहवाल प्रलंबित
बीड जिल्ह्यातील 116 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 2 जणांचे अहवाल प्रलंबित
बीड,दि.29 (प्रतिनिधी):-कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण चांगलेच फौफावले आहे. बीड जिल्ह्यातील 118 जणांचे स्वॅब आज लातूरला पाठवण्यात आले होते. त्यापैकी 116 जणांचे निगेटिव्ह आले आहेत तर रात्री उशिरा पर्यंत 2जणांचे रिपोर्ट प्रलंबित होते.
_________________________
दोन प्रलंबीत अहवालापैकी एक अहवाल पॉझिटीव्ह
बीड : दोन प्रलंबीत अहवालापैकी एक अहवाल पॉझिटीव्ह आला असून अन्य एक अहवालाबाबत कुठलाही निष्कर्ष काढता आलेला नाही, अशी माहिती लातूरच्या प्रयोगशाळेने अधिकृत प्रेसनोट काढून दिली आहे.
महिला पॉझिटिव्ह
पॉझिटीव्ह आढळलेली रुग्ण ही महिला असून ती मुंबईहून आलेली आहे. तर केजच्या एका अहवालाबाबत कुठलाही निष्कर्ष निघालेला नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी दिली.
________________________
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा