बीड शहरातील संभाजी नगर , बालेपीरच्या काही भागात कंटेनमेंट झोन घोषित
बीड शहरातील संभाजी नगर , बालेपीरच्या काही भागात कंटेनमेंट झोन घोषित
बीड प्रतिनिधी:
शहरातील संभाजीनगर बालेपीर येथील चार व्यक्तींच्या संपर्कातील एका व्यक्तीस कोरोना , विषाणूचे लागण ( COVID - १ ९ Positive ) झालेली आसल्याचे आढळून आला आहे . त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रेखावार यांनी काही भागात कंटेनमेंट झोन घोषित केला आहे . आजपासून हा भाग पुढील अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करण्यात आला आहे . बीड जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की , संभाजी नगर बालेपीर भागातील शेख खलीलोद्यीन शेख हफीजोद्यीन यांच्या घरापासून ते विजयकुमार किसनराव वीर यांच्या घरापर्यंतचा परिसर कन्टेनमेंट झोन ( Containment zone ) जाहिर करणे आवश्यक आहे , असा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी , बीड यांनी सादर केला आहे . त्या अनुषंगाने संभाजी नगर बालेपीर भागातील शेख खलीलोद्यीन शेख हफीजोद्यीन यांच्या घरापासून ते विजयकुमार किसनराव विर यांच्या घरापर्यंतचा परिसर पुढील अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा