हाळंब, कारेगांव व बारगजवाडी येथे कन्टेनमेंट झोन घोषित* *पूर्णवेळ संचारबंदी लागू--जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

*हाळंब, कारेगांव व बारगजवाडी येथे कन्टेनमेंट झोन घोषित* *पूर्णवेळ संचारबंदी लागू--जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

बीड, दि.27:- हाळंब येथे २, कारेगांव येथे १ व बारगजवाडी येथे २ कोरोना विषाणूचे लागण (COVID-१९ Positive)झालेले  रुग्ण आढळून आले आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .

   याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परळी वै. तालूक्यातील हाळंब या गावापासून ३ कि.मी. परिसरातील हाळंब,हेळंब,खोडवा सावरगांव, भोजनकवाडी, दैठणाघाट व खोडवा सावरगांवतांडा  तसेच पाटोदा तालूक्यातील कारेगांव या गावापासून ३ कि.मी. परिसरातील  कारेगांव, कारेगांव भोसलेवस्ती, कठाळवाडी, जन्नेवाडी, नाळवंडी त्यालगतचा शिरुर का. तालूक्यातील उखळवाडी, मोरजळवाडी व येवलवाडीनाथ (जानपीर) आणि शिरुर कासार तालूक्यातील बारगजवाडी या गावापासून ३ कि.मी. परिसरातील बारगजवाडी,बडेवाडी, शेरेवाडी व उंबरमुळी हा परिसर कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .
  
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन