मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ.बी.एन.देशमुख यांचे निधन

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ.बी. एन. देशमुख यांचे निधन

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती,माजी आमदार बॅ.बलभिमराव नरसिंगराव देशमुख ( बी.एन.) देशमुख काटीकर (८५वर्षे) यांचे मध्यरात्री १.३० चे सुमारास औरंगाबाद येथे निधन झाले आहे. त्यांचे पार्थिवावर आज सकाळी १० वाजता औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात मुलगा सुन दोन नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य अँड.नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे ते भाच्चे होत.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. उच्च व सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करत असताना राज्य विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. नंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. शेतकरी ,कष्टकरी कामगार तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ‘ऐतिहासिक’ ठरले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन